पिंपरी-चिंचवड
देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी सोमवारी सायंकाळी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार
Feb 19 2026
44
देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी सोमवारी सायंकाळी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार
पिंपरी, ता. १९ - शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सेक्टर क्रमांक २३ मधील तसेच इतर क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील स्थापत्य व विद्युतविषयक कामे करायची आहेत. त्यासाठी येत्या सोमवारी (ता. २३) निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी (ता. २४) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात आले आहे. नागरीकांनी पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा, असे आवाहनही पाणीपुरवठा विभागाने केले आहे.