news
clock
जुन्या भांडणाचा राग मनात धरुन टोळक्याची वडील-मुलाला मारहाण

जुन्या भांडणाचा राग मनात धरुन टोळक्याची वडील-मुलाला मारहाण

जुन्या भांडणाचा राग मनात धरुन टोळक्याची वडील-मुलाला मारहाण

पिंपरी, ता. २१ - जुन्या भांडणाचा राग धरुन गुरुवारी (ता. १९) सायंकाळी सुमारे ५ वाजता पत्राशेड-लिंकरोड-चिंचवड येथे वडील व मुलाला टोळक्याने मारहाण केली. शाम त्र्यंबक साळवे (४८) आणि त्यांचा मुलगा रोहित (२५) असे मारहाण झालेल्या वडील व मुलाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मुलगा रोहीत वय २५ वर्षे हे त्यांचे बिल्डींगजवळ बोलत उभे असताना यातील आरोपी त्याठिकाणी येवून फिर्यादीचा मुलगा रोहीत यास जुने भांडणाचा राग मनात धरुन शिवीगाळ दमदाटी करू लागल्याने फिर्यादी यांनी त्यास शिवीगाळ का करतोस असे विचारले असता आरोपीने त्यांना ठोसा बुक्क्यांनी मारहाण केली. खिशातून चावी काढून चावीने फिर्यादीच्या तोंडावर व पाठीवर मारून फिर्यादीला जखमी केले. त्याचवेळी फिर्यादीचा मुलगा व दाजी बाळू पवार हे भांडण सोडविण्यास तेथेगेले असता आरोपींनी आपापसात संगनमत करुन फिर्यादीचा मुलगा रोहित व दाजी बाळू पवार यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.

पोलीसांनी आरोपी अजय शेलार, मुन्ना खैरारिया, आकाश उनवणे आणि उज्वला उनवणे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories