news
clock
चिंचवडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, सात जणांवर गुन्हा दाखल

चिंचवडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, सात जणांवर गुन्हा दाखल

चिंचवडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, सात जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी, ता. २५ - वाल्हेकरवाडी येथील एम.आय.डी.सी. कॉलनीत सोमवारी (ता. २३) रात्री पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना नोटीस बजावली आहे. 

चिंचवड पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई उमेश देवचंद वानखडे (बकल नंबर २१२३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मंगळवारी (ता. २४) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील एम.आय.डी.सी. कॉलनीत आरोपी हे पैशावर ‘तीन पत्ती’ जुगार खेळताना आढळून आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून एकूण १५ हजार ६५० रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

जुगार खेळणारे रिजवान साबिर शेख (वय २१), बलीकुमार संतु मंडल (वय १९), अशोक दयाराम पंजवानी (वय ५०), दिलीप बनवारी सिंग (वय ४७), अरूण शिवनंदन सिंग (वय ४२), सुनिल मारुती दळवी (वय ५१) आणि लुकमान शेख या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींना बीएनएसएस कलम ३५ (३) नुसार नोटीस देण्यात आली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories