युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, युवकाला अटक
पिंपरी, ता. १८ - कोणत्यातरी कारणावरुन १९ वर्षीय युवकाने २४ वर्षीय युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये युवकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. ही घटना सोमवारी (ता. १६) गुलाबनगर-दापोडी
येथे घडली आहे. आरोपीवर मंगळवारी (ता. १७) दापोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार तुकाराम चाराकटले (वय-२४ वर्षे, खाजगी नोकरी रा. सिध्दार्थ नगर-दापोडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याने दापोडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आरोपी रोहीत उर्फ झुणझुण्या अशोक गुजरे (वय १९ वर्षे, रा. दापोडी) हा अटकेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार हा सिध्दार्थनगर-दापोडी येथून पाण्याचा जार घ्यायला मोटार सायकलवरुन जात होते. तेव्हा पाठीमागून येऊन आरोपींनी तुषारच्या डोक्यात धारदार लोखंडी कोयत्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जोरात वार केल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. केली आहे.
आरोपीविरोधात दापोडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९,३५२,३५१ (२) (३), भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३), सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.