news
clock
पिंपरीत मोटारसायकल पार्किंगच्या वादातून मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरीत मोटारसायकल पार्किंगच्या वादातून मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरीत मोटारसायकल पार्किंगच्या वादातून मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी, ता. २३ - संत तुकारामनगर परिसरात शनिवारी (ता. २१) सायंकाळी मोटारसायकल पार्किंगच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून एका इसमाला वडील व मुलाने लाकडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. या दोघांविरुद्ध रविवारी (ता.२२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (ता. २१) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संत तुकारामनगर येथील यशवंत मित्रमंडळाजवळ घडली. निलेश मधुकुमार तांदळे (वय ५१) व उज्वल निलेश तांदळे (वय १९) हे या घटनेतील आरोपी आहेत. आरोपी हे फिर्यादी सचिन अशोक नंदिकर (वय ४६, रा. संत तुकारामनगर, वल्लभनगर, पिंपरी) यांच्या घराच्या तळमजल्यावर राहतात.  

आरोपींनी मोटारसायकल पार्किंगच्या कारणावरुन नंदिकर यांना शिविगाळ करुन सोफ्याच्या लाकडी पायाने व लाथा बुक्याने डोक्यावर मारहाण करुन जखमी केले. आरोपींविरोधात  संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२),११५ (२),३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories