news
clock

रामनगर-चिंचवडमध्ये शेतात जुगार खेळणाऱ्या ६ जणांवर कारवाई

पिंपरी, ता. १४ - तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्या ६ जणांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. १३) रामनगर-चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे व त्यांना नोटीस बजावली आहे. हे सहा आरोपी शेतात बसून जुगार खेळत होते.

गुन्हे शाखा, युनिट - १ चे पोलीस हवालदार मारुती महादेव करचुंडे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १३)  भरत यलाप्पा पवार (वय ५५), सुभाष बन्सी ओहाळ (वय ५१), शिवाजी नागप्पा दोडमणी (वय ५४), मच्छिंद्र विठठल पवार (वय ५२), विनायक चंद्रशेखर धुमाळ (वय ४०), आणि सुरेश महादेव धनवटे (वय ४६) हे सहा जण "तीन पत्ती" नावाचा जुगार खेळत होते. आरोपींकडून एकूण रुपये ४,१७०/- रोख रक्कम तसेच जुगाराच्या पत्त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना नोटीसही बजावली आहे. 

रामनगर, Ramnagar, चिंचवड, Chinchwad, शेतात जुगार, gambling in farm, तीन पत्ती, Teen Patti, आरोपी, accused, पोलीस कारवाई, police action, नोटीस बजावली, notice issued, रोख रक्कम, cash seized, पत्त्यांचे साहित्य, cards material, गुन्हा, crime, महाराष्ट्र जुगार कायदा, Maharashtra Gambling Act, कलम 12(अ), Section 12(a), पिंपरी, Pimpri, हवालदार मारुती करचुंडे, constable Maruti Karchunde, भरत यलाप्पा पवार, Bharat Yalappa Pawar, सुभाष बन्सी ओहाळ, Subhash Bansi Ohal, शिवाजी नागप्पा दोडमणी, Shivaji Nagappa Dodmani, मच्छिंद्र विठठल पवार, Machhindra Vitthal Pawar, विनायक चंद्रशेखर धुमाळ, Vinayak Chandrashekhar Dhumal, सुरेश महादेव धनवटे, Suresh

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories