निगडीमध्ये ११ हजारांचा गांजा जप्त; आरोपीस अटक
पिंपरी, ता. १६ - ट्रान्सपोर्टनगर-निगडी येथे शनिवारी (ता. १४) रात्री ९.५० च्या सुमारास एका इसमाकडून ११ हजार ६००/- रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपी सुनील संपत म्हस्के (वय ४४, व्यवसाय-मजुरी, बालाजीनगर, भोसरी) याने २३२ ग्रॅम वजनाचा ११ हजार ६००/- रुपयांचा गांजा बेकायदेशीरपणे बाळगला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात एनडीपीएस अॅक्ट कलम८ (क), २० (ब) (ii) (अ) निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.