news
clock
रक्षक चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचे होणार 'सेफ्टी ऑडीट', महापालिकेचे आदेश

रक्षक चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचे होणार 'सेफ्टी ऑडीट', महापालिकेचे आदेश

रक्षक चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचे होणार 'सेफ्टी ऑडीट', महापालिकेचे आदेश 

पिंपरी, ता. ६ - औंध-रावेत बीआरटी मार्गावर रक्षक चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या रचनेमध्ये गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या कामाचे 'सेफ्टी ऑडीट' करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी या पुलाच्या कामाची पाहणी करुन सुधारणा सुचवल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने सेफ्टी ऑडीटचे आदेश दिले आहेत.

याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. पुलाचे काम सुरु राहणार आहे, असे महापालिकेने सांगितले आहे. रक्षक चौकात या उड्डाणपूलाच्या कामासाठी टी अॅण्ड टी इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. मे. इन्फाकिंग कन्सल्टिंग इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पुलाचा एकूण खर्च २२.७७ कोटी रुपये आहे. आतापर्यंत सुमारे ७५ टक्के निधी देण्यात आला आहे.

याबाबत सांगताना महापालिका सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर म्हणाल्या, '' इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम सुरु आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून सेफ्टी ऑडिटचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. तोपर्यंत काम सुरु राहील.''


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories