news
clock
वाकडमध्ये भुयारी मार्गात अपघात, दुचाकीस्वार जखमी

वाकडमध्ये भुयारी मार्गात अपघात, दुचाकीस्वार जखमी

वाकडमध्ये भुयारी मार्गात अपघात, दुचाकीस्वार जखमी

पिंपरी, ता. १७ - संतोषनगर-थेरगाव येथील भुयारी मार्गात तीनचाकी टेम्पो चालकाने निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने वाहने चालवल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (ता. १५)  सायंकाळी ४.३० वाजता घडला आहे. या प्रकरणी टेम्पोचालकाविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष पुंजाराम खरात (वय ३३, रा. कृष्णा रेसिडेन्सी, काळेवाडी, पुणे) हे कामावरून घरी जात असताना संतोषनगर–थेरगाव येथील भुयारी मार्गातील १६ नंबरजवळील सर्व्हिस रोडवर त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी भुयारी मार्गातून समोरुन येणाऱ्या तीनचाकी टेम्पो चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून खरात यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते जखमी झाले. 

या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ)(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories