चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ ६ किलो गांजा जप्त, आरोपीला अटक
पिंपरी, ता. ४ - चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ पोलिसांनी शुक्रवारी (ता. ३) ३ लाख ३ हजार रुपयांचा ६ किलो ५५ ग्रॅम गांजा व १ मोबाईल पोलिसांनी एका ६८ वर्षीय इसमाकडून जप्त केला आहे. त्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार विशाल शिवाजीराव गायकवाड (मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड) यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. आरोपी जवाहर अर्जुनदास रामनानी (वय ६८, रा. बी ब्लॉक, रूम नं. १, रिव्हर रोड, पिंपरी) याच्या ताब्यातून ३ लाख ३ हजार रुपये किमतीचा ६ किलो ५५ ग्रॅम गांजा आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला.
आरोपी हा गांजा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली आहे. त्याच्याविरोधात एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.