news
clock
पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात एकूण ५० नवीन वाहने दाखल, ४२ दुचाकी व ८ चारचाकी वाहनांचा समावेश

पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात एकूण ५० नवीन वाहने दाखल, ४२ दुचाकी व ८ चारचाकी वाहनांचा समावेश

पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात एकूण ५० नवीन वाहने दाखल, ४२ दुचाकी व ८ चारचाकी वाहनांचा समावेश 

पिंपरी, ता. ११ - पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दल अधिक सुसज्ज झाल आहे. कारण, नुकतेच  पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहनांच्या ताफ्यात नव्याने ४२ दुचाकी आणि ८ चारचाकी वाहने दाखल झाली आहेत. वाहनांची संख्या वाढल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या आवारात या वाहनांचे पूजन करण्यात आले. 

 पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे शहर पोलिस दलाची सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत. पोलिस नागरीक संवाद, ज्येष्ठ नागरीकांसाठी हेल्पलाईन...असे स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवले आहेत. आता नवीन वाहनेही पोलिसांच्या दिमतीला उपलब्ध झाली आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारला तेव्हा शहर पोलीस दलात १८० - मोटार सायकल, १२ - कार १२, १०९ - जीप, १२ - लाईट व्हॅन, ६ - अशी एकुण ३१९ वाहने उपलब्ध होती. ही वाहने विस्तारणाऱ्या शहरातील कामकाजासाठी अपुरी पडत होती. त्यामुळे पोलिस आयुक्त चौबे  यांनी शहर पोलिस दलातील वाहनांची संख्या वाढवण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालय व जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवून सातत्याने पाठपुरावा केला, त्याला यश मिळाले. नुकतीच, ५० वाहने शहर पोलिस दलात दाखल झाली.

पोलिस आयुक्त चौबे  यांच्या कार्यकाळात एकुण ३६७ वाहने पोलीस आयुक्तालयासाठी उपलब्ध झाली आहेत. त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीकडून मोटार सायकल - १०२, जीप - १५७, लाईट व्हॅन-३ व ट्रक-१ अशी एकुण २६३ वाहने प्राप्त केली आहेत. त्यापैकी २५ मोटारसायकल हया बजाज कंपनीने पुरस्कृत केलेल्या आहेत. तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मोटार सायकल- ७१, कार-२, जीप-१, लाईट व्हॅन-१६, बस-१३, टॅन्कर-०१ अशी एकूण १०४ वाहने प्राप्त केली आहेत.

प्राप्त झालेल्या नव्या वाहनांमुळे आपत्कालीन घटनांना तत्काळ प्रतिसाद देणे, नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवणे व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे,  असा विश्वास पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी व्यक्त केला आहे.







Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories