news
clock

महापालिका व एमएनजीएल यांनी समन्वयाने काम करावे - महापौर रवी लांडगे

पिंपरी, ता. १७ - ''शहरातील नागरिकांना सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सुलभ नैसर्गिक गॅस सेवा उपलब्ध व्हावी. विकासकामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, यासाठी महानगरपालिका व एमएनजीएल यांनी समन्वयातून काम करावे.'', असे महापौर रवी लांडगे सांगितले.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) मार्फत पिंपरी-चिंचवडमध्ये शहरात नैसर्गिक वायू वितरणाशी संबंधित विविध कामे अधिक वेगाने, प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने एमएनजीएलचे अधिकारी आणि महापौर रवी लांडगे व महापालिकेचे अधिकारी यांची बैठक झाली. विविध प्रकल्पांसाठी महापालिकेकडून आवश्यक परवानग्या लवकर मिळाव्यात यासाठी सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, व्यावसायिक संचालक शंकर करजगी, भाग्यश्री मंथलकर उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन चर्चा केली. आयुक्तांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना एमएनजीएलच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांबाबत तातडीने कार्यवाही करून परवानगी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories