गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात मोठी वाहनखरेदी, नवीन १० हजार २२१ वाहनांची नोंद
Mar 20 2026
77
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात मोठी वाहनखरेदी, नवीन १० हजार २२१ वाहनांची नोंद
पिंपरी, ता. २० - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडमध्ये नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी केली आहे. शहरात नवीन १० हजार २२१ वाहनांची नोंद झाली आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तूमध्ये सोने, इलेक्टॉनिक उपकरणे तसेच वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा ५ ते १९ मार्च या १५ दिवसांत पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात १० हजार २२१ वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये, ५ हजार ८०५ दुचाकी आणि ३ हजार ८१ चारचाकींची नोंद आहे.
गुढीपाडव्याला नवी वाहने घरी आणण्यासाठी दुचाकी-चारचाकींच्या शोरुम्समध्ये सकाळपासून नागरीकांची गर्दी झाली होती. सहकुटुंब नव्या वाहनाची पूजा करुन आणि वाहनासोबत फोटोसेशन करुन नागरीकांनी आपले नवे वाहन घरी आणले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सन २०२५ मध्ये ६,४४५ दुचाकी, ४,०१७ कार, ३३० तीनचाकी व ४११ हलक्या मालवाहतूक वाहनांची खरेदी झाली आणि सन २०२६ मध्ये ५ हजार ८०५ दुचाकी, ३ हजार ८१ कार आणि ३२९ तीनचाकी व ३८७ चारचाकी वाहनांची खरेदी झाली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे.