news
clock
किरकोळ वादातून केलेल्या चाकू हल्ल्यात मुलगा व वडील जखमी

किरकोळ वादातून केलेल्या चाकू हल्ल्यात मुलगा व वडील जखमी

किरकोळ वादातून केलेल्या चाकू हल्ल्यात मुलगा व वडील जखमी

पिंपरी, ता. १७ - किरकोळ वादातून एका युवकाने त्याच्या ओळखीच्या वडील व मुलावर घरगुती वापराच्या चाकूने वार केले, जाधववाडी-चिखली येथे सोमवारी (ता. १६) घडलेल्या या घटनेत वडील व मुलगा जखमी झाले आहेत. आरोपीवर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत, सूरज सुरेंद्र कश्यप (वय २० वर्षे, नोकरी, रा.चिखली) याने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीच्या या घटनेत विजय बिंद (वय १९ वर्षे, रा. चिखली) हा आरोपी आहे. फिर्यादी व त्याचे वडील सुरेंद्र जदुराम कश्यप (वय ४० वर्षे) हे दोघे त्यांच्या खोलीत बसले असताना आरोपी विजयने फिर्यादी सूरज व त्यांच्या वडीलांशी १०० रुपये घेतल्याच्या कारणावरुन वाद घातला. त्यांना शिवीगाळ करुन घरगुती वापराच्या चाकुने फिर्यादीच्या मानेवर, पाठीवर मारुन दुखापत केली. त्यावेळी फिर्यादी सूरजचे वडील भांडणे सोडवण्यासाठी गेले असता त्यांना आरोपीने घरगुती वापराचा चाकू डाव्या गालावर मारुन गंभीर दुखापत केली आहे, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात  भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ११८ (१), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories