कोयता फिरवत धमकावून दहशत निर्माण केल्याप्रकरणी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल!

कोयता फिरवत धमकावून दहशत निर्माण केल्याप्रकरणी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल!

निघोजे | 16 सप्टेंबर 2026 : ‘आम्ही इथले भाई आहोत, तुम्ही कोणी मध्ये आलात तर बघा,’ असे म्हणत चिकन दुकानात येणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करणे, त्यांना दुकानाकडे जाण्यापासून रोखणे तसेच कोयता फिरवून धमकावत सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याचा प्रकार निघोजे येथे घडला. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीत आजी-आजोबा केंद्राजवळ, बारामती अ‍ॅग्रो चिकन सेंटरसमोर घडली.

या प्रकरणी अमृत सतीश नेवाळे (पोलीस शिपाई, ब. नं. 2863, नेमणूक दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी ओमकार राजकुमार डोंगरे (वय 23, रा. आल्हाट वस्ती, निघोजे, ता. खेड, जि. पुणे) आणि समाधान विजय ढाकणे (वय 22, रा. थिगळे वस्ती, निघोजे, ता. खेड, जि. पुणे) अशी आहेत.

दोन्ही आरोपींनी चिकन दुकानात येणाऱ्या लोकांना शिवीगाळ करत दुकानाकडे येण्यास मज्जाव केल्याचा आरोप आहे. त्यापैकी ओमकार डोंगरे याने लोकांच्या दिशेने कोयता फिरवत धमकावले.

आरोपी सार्वजनिक ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडवत दहशत निर्माण करत असताना मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 741/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता, भारतीय शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि संबंधित कायद्यांच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories