पिंपरी-चिंचवड
५२ कोटींच्या गैरव्यवहारात विनाकारण माझे नाव ओढू नये - नगरसेवक प्रमोद कुटे
Apr 13 2026
63
५२ कोटींच्या गैरव्यवहारात विनाकारण माझे नाव ओढू नये - नगरसेवक प्रमोद कुटे
पिंपरी, ता. १३ - महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी उपसूचनांच्या आधारे ५२ कोटींहून अधिक रकमेची बिले ठेकेदारांना परस्पर अदा केली आहेत. सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी या उपसूचनांवर सह्या केल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याही उपसूचनेवर मी सही केलेली नाही, याबाबत मला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी स्पष्टे केले आहे. याविषयी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.
त्यामुळे याप्रकरणाची महापालिका प्रशासनाने सखोल चौकशी करावी. चौकशी करुन गुन्हा दाखल करावा.