'एसटी' महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हफ्ता खात्यात जमा 

 कर्मचाऱ्यांनी मानले एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांचे आभार 

पुणे, ता. २६ - राज्य परिवहन महामंडळाच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. थकीत वेतनासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली. 

हा कामगारांना आर्थिक दिलासा आहेच, त्याबरोबरीने  शासनाची संवेदनशीलता, कर्मचाऱ्यांप्रती बांधिलकीचा प्रत्यय आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

थकीत हप्त्यांची प्रक्रिया डिसेंबरपासून सुरु झाली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणे अशक्य झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. त्यामुळे, सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत २१० कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. थकीत वेतनाचा फेब्रुवारीचा हफ्ता कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. 

मंगळवारी (ता. २४) कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीचा हप्ता जमा झाला आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ''विश्वासाचा सूर्य पुन्हा तेजाने उगवला, दिलेला शब्द पाळला' अशी भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance