news
clock
एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदी प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप सहन केला जाणार नाही - प्रताप सरनाईक

एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदी प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप सहन केला जाणार नाही - प्रताप सरनाईक

एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदी प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप सहन केला जाणार नाही - प्रताप सरनाईक

पिंपरी, ता. २५ - महाराष्ट्र राज्य महामंडळाची डिझेल खरेदी निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक असून, कोणताही बाह्य हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट  इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. “काही माध्यमांमधून चुकीच्या माहितीचा प्रचार करून निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रयत्नांना आम्ही कोणतीही मान्यता देणार नाही.” असे सरनाईक यांनी सांगितले.

सरनाईक यांनी सांगितले की, सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी १०.८५ लाख लिटर डिझेलची गरज भासते, ही खरेदी मुख्यत्वे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून केली जाते. या कंपन्या प्रति लिटर सुमारे २.५० रुपये सवलत देतात. तरीही इतर राज्यांना जास्त सवलत मिळत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. इतर राज्यांनी राबवलेल्या तत्त्वांनुसारच एसटीनेही निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. काही गटांनी न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयाने निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.  निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचे प्रयत्न कंपन्यांनी थांबवले पाहिजेत, हे आम्ही सहन करू शकत नाही.

एसटी महामंडळावर सध्या १२ हजार कोटींचा संचित तोटा असून, आतापर्यंत २,४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. लवकरच १,००० नवीन डिझेल बसेस राबवल्या जातील, ज्यामुळे वाहतुकीची क्षमता ४,३०० कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. एसटीची आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता आमची प्राथमिकता आहे. निविदा प्रक्रिया नियमानुसार, निष्पक्षपणे राबवली जाईल; महामंडळाच्या हितासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories