news
clock
स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरुन महापालिका सर्वसाधारण सभेत गोंधळ

स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरुन महापालिका सर्वसाधारण सभेत गोंधळ

स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरुन महापालिका सर्वसाधारण सभेत गोंधळ 

पिंपरी, ता. ६ - महापालिकेच्या सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. ५) गोंधळात पार पडली. स्वीकृत नगरसदस्यांच्या नियुक्तीच्या विषयावरुन गोंधळ सभागृहात मोठा गोंधळ झाला. गेल्या सभेतही हा विषयही प्रलंबित राहिला होताच आणि या सभेतही या विषय तहकूब करुन पुढे ढकलल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करत स्वीकृत सदस्यांचा विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न केले. या गोंधळामुळे सभेचे कामकाज महापौरांनी पुन्हा तहकूब केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी, आमच्या सदस्यांची नियुक्ती करा, तुमच्या सदस्यांची नियुक्ती जेव्हा करायची तेव्हा करा, अशी भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, ''पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची नियुक्ती झाली आहे. शहरात आमचे एकमत होऊन आम्ही नावे दिली आहेत. अर्ज करुन ते वैधही ठरले आहेत. तरीही पुन्हा हा विषय तहकूब केला जात आहे. भाजपमधीलही अनेक जण स्वीकृत नगरसेवक नियुक्तीच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगतात. त्यामुळे, आमची नावे जाहीर करुन टाका, तुमची नावे पुढच्या वर्षी जाहीर केली तरी चालतील.''  

मात्र, एवढ्या गोंधळानंतरही हा विषय काल पुन्हा एकदा तहकूब करुन पुढे ढकलला आहे. त्यानंतर, सभेचे पुढचे कामकाज पार पडले. सभेच्या सुरवातीला नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ कामकाज काही वेळेसाठी तहकूब करण्यात आले. सभागृहाने चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories