news
clock

रेशन दुकानांमध्ये मार्च महिन्याचा ९० टक्के धान्यसाठा उपलब्ध, ३१ मार्चपर्यंत वाटप पूर्ण करण्याचे उद्दीष्ट

पिंपरी, ता. १३ - शहरातील रेशन दुकानांमध्ये मार्च महिन्याचा सुमारे ९० टक्के धान्याचा साठा दाखल झाला  आहे व धान्य वितरणास सुरुवात झाली आहे. उर्वरित साठा लवकरच उपलब्ध होणार असून ३१ मार्चपर्यंत सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

फेब्रुवारीमध्ये महिनाअखेरीलाही सुमारे १० टक्के लाभार्थ्यांना धान्य मिळाले नाही. त्यामुळे रेशन दुकानदार संघटनेने धान्य कॅरी फॉरवर्ड करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुरवठा विभागाने धान्यवाटपास ६ ते १० मार्च दरम्यान मुदतवाढ दिली. दुकानदारांना तांदूळ उशिरा मिळणे, तसेच अनेक ठिकाणी वितरणाच्या मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होणे, यामुळे फेब्रुवारीमध्ये वितरणात विलंब झाला होता. 

आता, मार्च महिन्याचा धान्य साठा अनेक दुकानांमध्ये उपलब्ध झाला असून, सोमवार वगळता वितरण सुरू झाले आहे, ऑल महाराष्ट्र रेशन दुकानदार संघटनेचे खजिनदार विजय गुप्ता यांनी सांगितले.

मार्चचा ९० टक्के धान्यसाठा उपलब्ध.........

''मार्च महिन्याचा सुमारे ९० टक्के धान्यसाठा दुकानांमध्ये उपलब्ध झाला आहे. शहरातील रेशन दुकानांतून धान्य वितरण सुरु असून ३१ मार्चपर्यंत ते पूर्ण करण्यात येईल.''

- प्रदीप डंगारे, 'ज' परिमंडळ अधिकारी


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories