news
clock
कॉमनवेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषदेसाठी आमदार अमित गोरखे यांची निवड

कॉमनवेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषदेसाठी आमदार अमित गोरखे यांची निवड

कॉमनवेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषदेसाठी आमदार अमित गोरखे यांची निवड

देशभरातील निवडक लोकप्रतिनिधींच्या यादीत 'पिंपरी-चिंचवड'चा सन्मान

पिंपरी, ता. ८ - 'कॉमनवेल्थ संसदीय संघटना (CPA) वेस्ट झोन - ७' तर्फे गोवा येथे ८ ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या परिषदेसाठी आमदार अमित गोरखे यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. 

या परिषदेत देशातील निवडक आणि अभ्यासू आमदारांना सहभागी करुन घेतले जात आहे आणि गोरखे यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळाणार आहे, हे कौतुकास्पद आहे. या परिषदेला  लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा विधानसभा अध्यक्ष डॉ. गणेश गावंकर, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह,  महाराष्ट्र विधानसभेचे  अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, गुजरात विधानसभा अध्यक्ष शंकरभाई चौधरी, गोव्याचे राज्यपाल  राज्य पुसापती अशोक गजपती राजू, गोव्याचे राज्यमंत्री माविन गोडिन्हो,  गोवा विधानसभा उपाध्यक्ष जोशुआ पीटर डीसूझा यांची उपस्थिती असणार आहे. 

परिषदेच्या पहिल्या भागात 'विकसित भारत - २०४७' साध्य करण्यात युवा विधिमंडळ सदस्यांची भूमिका  या विषयानर चर्चासत्र होणार असून त्यात आमदार गोरखे महाराष्ट्राचा विकासाचा दृष्टिकोन, युवा नेतृत्वाची जबाबदारी आणि धोरणात्मक दिशा प्रभावीपणे मांडणार आहेत. दुसऱ्या भागात 'व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण आणि किनारी संपर्क या क्षेत्रांतील वेस्ट झोन–७ ची प्राधान्ये' या विषयावर चर्चासत्र होईल. याशिवाय, परिषदेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि आंतरराज्य समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास....

याबाबत बोलताना आमदार गोरखे म्हणाले, ''माझी निवड केवळ वैयक्तिक सन्मान नसून महाराष्ट्राच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आहे. ‘विकसित भारत - २०४७’ या राष्ट्रीय ध्येयपूर्तीत महाराष्ट्राची भूमिका ठामपणे मांडणे तसेच युवा नेतृत्वाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीसाठी ठोस धोरणात्मक विचार मांडणे, ही माझी प्राथमिकता असेल''



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories