महानगरपालिकेने अभय योजनेला मुदतवाढ द्यावी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी
Mar 30 2026
49
महानगरपालिकेने अभय योजनेला मुदतवाढ द्यावी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी
पिंपरी, ता. ३० - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून मालमत्ता करावरील दंडात ९० टक्के सवलत देणारी ‘अभय योजना’ सध्या सुरु असून या योजनेची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ आहे. या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापौरांकडे केली आहे.
याबाबत, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महापौर रवी लांडगे यांना निवेदन दिले आहे. यावेळी सचिव मनोज लांडगे, कामगार सेना प्रतिनिधी नितीन सूर्यवंशी, शाखाध्यक्ष सुधाकर अर्जुन, बंटी कांबळे आणि आजम शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चिखले यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश नागरिक हे कामगार वर्गातील असून त्यांचे पगार साधारणतः महिन्याच्या १० तारखेच्या आसपास होतात. त्यामुळे एकरकमी मालमत्ता कर भरणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे अभय योजनेला मुदवाढ द्यावी. तसेच, झोपडपट्टीधारकांना कर भरण्यासाठी तीन ते चार हप्त्यांमध्ये रक्कम भरण्याची सुविधा द्यावी, असे निवेदनात सांगितले आहे.