आमदार रोहित पवार यांना पोलिस संरक्षण द्यावे, खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे
Feb 20 2026
42
आमदार रोहित पवार यांना पोलिस संरक्षण द्यावे, खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे
पिंपरी, ता. २० - 'आमदार रोहित पवार दादांच्या अपघाताचे सत्य पुढे आणण्यासाठी धडपडत आहेत. केवळ भावनाच नव्हे, तर अभ्यासपूर्वक मुद्दे, माहिती दररोज पुढे आणत आहे. आता राज्यातील जनतेकडून रोहितबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे, तशीच आम्हालाही त्याची काळजी आहे. रोहित प्रामाणिकपणे लढत आहे, त्यामुळेच रोहितला पोलिस संरक्षण द्यावे, अशी विनंती मी राज्य सरकारला करणार आहे,' असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (ता. १९) सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजीनगर येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास सुळे यांनी गुरुवारी अभिवादन केले. या वेळी पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, पक्षाचे नेते विशाल तांबे, सक्षणा सलागर आदी उपस्थित होते. यावेळी सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
''रोहित, पार्थ व जय या मुलांमध्ये अजित दादांच्या अपघाताबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे. मी देखील याबद्दल वारंवार बोलले आहे. दादांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांच्या मनात प्रश्न आहेत. तेच प्रश्न रोहित आणि जयच्या मनातही आहेत. पार्थ व जय यांना मोठा धक्का बसलेला आहे, या घटनेतून बाहेर पडत ते आता बोलत आहेत. त्यातूनच जयने अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. '' असे सुप्रियाताईंनी सांगितले.
-----------------------------------------------------------------------