news
clock
स्थायी समिती व विषय समिती सदस्यांची उद्या निवड होणार

स्थायी समिती व विषय समिती सदस्यांची उद्या निवड होणार

स्थायी समिती व विषय समिती सदस्यांची उद्या निवड होणार 

पिंपरी, ता. १९ - पिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब झालेली विशेष सभा शुक्रवारी (ता. २०) होणार आहे. या विशेष सभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड केली जाणार आहे आणि विविध विषय समित्यांसाठी प्रत्येकी ९ सदस्यांची निवड होणार आहे.

महापौर व उपमहापौर यांची निवड झाल्यानंतर ६ फेब्रुवारीची विशेष सभा शुक्रवारी तहकूब केली आहे. त्या सभेच्या विषयपत्रिकेवरील स्थायी समितीसह विषय समिती सदस्यांची निवड केली जाईल. स्थायी समितीसाठी भाजपच्या ११, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अप) ४ आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाला संधी मिळेल. विधी समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, शिक्षण समिती आणि महिला व बालकल्याण समिती या पाच समित्यांमध्ये प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये भाजपच्या सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांना प्रत्येक समितीमध्ये संधी मिळणार आहे.

महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले की,  ''विशेष सभेत गटनेत्यांकडून आपापल्या पक्षाच्या नगरसेवकांची यादी बंद पाकिटात महापौरांकडे सादर केली जाईल. त्यानंतर त्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. समिती सदस्यांच्या निवडीनंतर अध्यक्षांची निवड निश्चित दिवशी केली जाईल.''

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories