news
clock
गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

पिंपरी, ता. २० - चिंचवड पोलीस ठाणे हद्दीत विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून सुमारे १४८ ग्रॅम वजनाचा, अंदाजे ७ हजार ४०० रुपयांचा गांजा जप्त केला. 

ही कारवाई बुधवारी (ता. १८) रात्री सुमारे ११.४० वाजता एमआयडीसी पानवठा मेनगेटजवळ करण्यात आली. कुणाल शिवाजी डोईफोडे (वय २६, रा. एकविरानगर, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो रिक्षाचालक आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे १४८ ग्रॅम वजनाचा, अंदाजे ७ हजार ४०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गुरुवारी (ता. १९) आरोपीविरोधात  एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुगरे करत आहेत.

--------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories