news
clock
देशभक्ती आपल्या प्रत्येक कृतीत आणि समाजाच्या विकासात प्रकटली पाहिजे - आमदार महेश लांडगे

देशभक्ती आपल्या प्रत्येक कृतीत आणि समाजाच्या विकासात प्रकटली पाहिजे - आमदार महेश लांडगे

देशभक्ती आपल्या प्रत्येक कृतीत आणि समाजाच्या विकासात प्रकटली पाहिजे - आमदार महेश लांडगे

जगदंब प्रतिष्ठानाच्या संकल्पनेतून कृष्णानगरमध्ये उभारलेल्या ५१ फुटी भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण

पिंपरी, ता. २० -  ''देशभक्ती ही फक्त उत्सव, गाणी, ध्वज यापुरती मर्यादित नाही. देशभक्ती आपल्या प्रत्येक कृतीत आणि समाजाच्या विकासात प्रकटली पाहिजे. जेथे श्रद्धा आणि समर्पण असते, तिथे राष्ट्रभक्तीची खरी उंची गाठता येते.'' अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.  

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. १९) कृष्णानगर-प्रभाग क्रमांक ११ येथे ५१ फुटी भव्य भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभागात उंचच उंच ध्वज उभारण्याची संकल्पना जगदंब प्रतिष्ठानाची आहे. स्थानिक नगरसेविका रिटा सचिन सानप आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन सानप यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. 

ते म्हणाले, ''भगवा ध्वज हे फक्त भगवे वस्त्र नाही, तर त्यामध्ये आपली एकता, आपली ओळख आणि आपल्या भविष्याची दिशा दडलेली आहे. नागरिकांनी हा संदेश आत्मसात केला तरच आपण वास्तवात राष्ट्रभक्तीचा आदर्श निर्माण करु शकतो. आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे, आपली मूल्ये जोपासायची आहेत. प्रत्येक छोटा उपक्रम समाजात मोठा बदल घडवू शकतो.''

ध्वजस्तंभावर भगवा ध्वज फडकताच नागरीकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी आमदार महेश लांडगे, कामगार नेते सचिन  लांडगे, नगरसेवक निलेश नेवाळे, कुंदन गायकवाड,  योगिता नागरगोजे, पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, अमित जावळे, अजय सायकर, महादेव कवितके, अरुण पाडुळे, अजय साने, संतोष ठाकूर, विनोद रोकडे, अशोक खराबे, हिंदुराव पाटील, पोपट हजारे, सुधाकर धुरी, अशोक मगर, अनिल सोमवंशी, ऋषिकेश जाधव, गणेश भुजबळ, पन्नालाल जाधव, सुनीता जगताप, कविता हिंगे यांच्यासह जगदंब प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories