पिंपरी-चिंचवड | 12 सप्टेंबर 2026 : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी परिमंडळ 2 हद्दीतील 19 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. संबंधितांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीसह पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गणेशोत्सव काळात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक व प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, परिमंडळ 2 मधील विविध पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांविरोधात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 56 अंतर्गत तडीपारीचे आदेश पारित करण्यात आले आहेत. गुन्हे प्रतिबंधासाठी आणि उत्सवकाळात शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
तडीपार करण्यात आलेल्या व्यक्ती वाकड, काळेवाडी, रावेत, हिंजवडी आणि बावधन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आहेत. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन, काळेवाडीतील सहा, रावेतमधील तीन, हिंजवडीतील तीन आणि बावधनमधील चार जणांचा कारवाईत समावेश आहे.
| क्र. | नाव | वय | पत्ता |
|---|---|---|---|
| 1 | रोहन नानासाहेब शेंवते | 24 | लक्ष्मीबाई कॉलनी, ताथवडे, पुणे |
| 2 | विद्या अनिल राठोड | 42 | अश्विनायक कॉलनी, कळाटेनगर, वाकड रोड, कॅपिटल टॉवर समोर, वाकड, पुणे |
| 3 | रेश्मा मिथुन आटोटे | 34 | बालाजीनगर, भोसरी, पुणे |
| 4 | पंकज संतोष चौथे | 27 | जगतापनगर, लेन नं. 04, थेरगाव, पुणे |
| 5 | आदित्य बाबासाहेब शेंडगे | 22 | सुनिता अपार्टमेंट, पिंपळे सौदागर, पुणे |
| 6 | युवराज चांगदेव फगे | 22 | जांभुळकर लेन नं. 06, पिंपळे गुरव, पुणे |
| 7 | आशिष/दादल्या एकनाथ शेटे | 24 | कृष्णा कॉलनी, गोडांबे चौक, नवातवस्ती, रहाटणी, पुणे |
| 8 | श्रवण विजय माचरे | 20 | साईकृष्ण पार्क, ई बिल्डिंग, रूम नं. 302, डांगे चौक, थेरगाव, पुणे |
| 9 | सुशील बाबू शिंदे | 32 | श्रीकृष्ण कॉलनी नं. 02, नदेनगर, काळेवाडी, पुणे |
| 10 | ऋषिकेश हरी आटोळे | 32 | पवारनगर गल्ली नं. 07, बेलठीकानगर, मेडप्लस मेडिकलसमोर, शिवदर्शन कॉलनीसमोर, थेरगाव, पुणे |
| 11 | अमिन खाजाभाई शेख | 55 | सी/ओ संजय भोंडवे, एस. बी. पाटील शाळेजवळ, भोंडवे वस्ती, रावेत, पुणे |
| 12 | नितीन पांडुरंग गव्हाळे | 27 | रमाबाईनगर, रावेत, पुणे |
| 13 | अशोक सदाशिव गायकवाड | 41 | रमाबाईनगर, रावेत, पुणे |
| 14 | ज्योती नटवर उर्फ नटरू मारवाडी | 41 | पाण्याच्या टाकीसमोर, महसूल व वन विभागाचे महसूल कार्यालयाजवळ, जांभे, ता. मुळशी, जि. पुणे |
| 15 | अक्षय विलास नांगरे | 29 | सातव वस्ती, लवळे, ता. मुळशी, जि. पुणे |
| 16 | एडविन अँथोनी फर्नांडिस | 30 | एक्सरव्हिया सोसायटी, बिल्डिंग नं. ए-22, फ्लॅट नं. 11, नेरे दत्तवाडी, ता. मुळशी, जि. पुणे |
| 17 | किरणदेवी मनोज नट | 22 | स्मशानभूमीजवळ, महाळुंगे, ता. मुळशी, जि. पुणे; मूळ गाव मुंडा, ता. सावळा, जि. डुंगरपूर, राजस्थान |
| 18 | संदीप बबन भुंडे | 46 | तलाठी ऑफिसजवळ, पाटीलनगर, बावधन, ता. मुळशी, जि. पुणे |
| 19 | नितीन रामेश्वर भारती | 25 | शालीन निवास, बालाजीनगर, पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे |
| 20 | सम्राट भागवत शिंदे | 20 | अर्जुननगर, उत्तम स्वीटजवळ, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, महाळुंगे, मुळशी, पुणे |
ही कारवाई सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी तडीपारीचे आदेश पारित केले आहेत.