news
clock
मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक,  ११ मोटार सायकल जप्त

मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, ११ मोटार सायकल जप्त

मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक,  ११ मोटार सायकल जप्त

संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाची कामगिरी 

पिंपरी, ता. ३१ - सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे  मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. चोरीच्या गुन्हयातील ११ मोटार सायकल असा एकुण ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी  संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने केली आहे. संतोष शिवराम घारे (वय ४४ वर्षे, रा. ता. मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

परिमंडळ- १ चे पोलीस उपायुक्त संदिप आटोळे व सांगवी विभागाचे  सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे  यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

 संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे, बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी संतोष शिवराम घारे (वय ४४ वर्षे, रा. ता. मावळ)  यास कामशेत येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने पिंपरी-चिंचवड व पुणे शहर पोलीस आयुक्त्तालयाच्या हद्दीतून  एकुण ११ मोटार सायकली चोरी केल्याचे उघडकीस आले.  त्याच्याकडून एकूण ५,९५,०००/- रुपये किंमतीच्या एकूण ११ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. 

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त परीमंडळ-१ संदिप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त सांगवी विभाग सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली संत तुकारामनगर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुहास अआव्हाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील, पोलीस अंमलदार दत्तु पाटेकर, अनिल मोहीते, ज्ञानेश्वर भुरे, भागवत गायकवाड, विठ्ठल भारमळ, जावेद मुजावर, संतोष रजपुत, सुनिल धावारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories