news
clock
चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगाराला अटक,  हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाची कामगिरी

चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगाराला अटक, हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाची कामगिरी

चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगाराला अटक,  हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पिंपरी, ता. २० - मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला हिंजवडी पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. १०० पेक्षाजास्त सी.सी.टि.व्हि फुटेज तपासून पोलिसांनी या गुन्हेगाराला शोधले. आरोपी ओमकार राजेश बनसोडे (वय २३ वर्षे, रा. मांजरी, पुणे) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.

दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजता फिर्यादी महिला  मॉर्निंग वॉकसाठी गेली असता त्यांचे गळयातील सोन्याचे छोटे गंठण मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी जबरदस्तीने ओढून नेऊन फिर्यादी महिलेस ढकलून देऊन जखमी केले होते. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) अन्वये दोन अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल झाला.

 हिंजवडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील व आजूबाजूचे १०० पेक्षाजास्त सी.सी.टि.व्हि फुटेज तपासले. तपास पथकाने  तांत्रिक विश्लेषण करुन दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेतला. आरोपी ओमकार राजेश बनसोडे (वय २३ वर्षे, रा. मांजरी, पुणे) याला मांजरी-पुणे येथून शिताफतीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे दाखल गुन्हयाचा  तपास केला असता त्याने सदरची चोरी हा त्याचा साथीदार पाहिजे आरोपी विशाल विलास काळे (रा. मांजरी, पुणे) यांच्यासोबत मिळून केल्याचे कबूल केले.

आरोपी ओमकार याला अटक करुन त्याच्याकडून दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले आहे. त्याच्याकडे पोलीस कोठडी रिमांडमध्ये अधिक तपास केला असता आरोपींनी अशाच प्रकारे पहाटे मॉर्निंग वॉक करता जाणाऱ्या महिल्यांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरी केली असल्याचे सांगितले.  सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ अधिक तपास करत आहेत. 

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,  डॉ. शशीकांत महावरकर (सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड), बसवराज तेली (अपर पोलीस आयुक्त), सारंग आवाड (अपर पोलीस आयुक्त), विशाल गायकवाड (पोलीस उप आयुक्त परि. २), बाळासाहेब कोपनर (सहा. पोलीस आयुक्त, हिंजवडी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे  हृषिकेश घाडगे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, श्रेणी पोलीस उप निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार, नरेश बलसाने, चिंतामणी जोशी, कैलास केंगले, विजय गेंगजे, संदीप मासाळ, कबीर पिंजारी, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर, अरुण पारधी, अजित शिंदे, मंगेश लोखंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories