news
clock
वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार गजाआड, दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याची कामगिरी

वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार गजाआड, दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याची कामगिरी

वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार गजाआड, दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याची कामगिरी 

पिंपरी, ता. २१ - दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वाहन चोरी करणाऱ्या २० वर्षीय सराईत गुन्हेगारास  अटक केली आहे. त्याच्याकडून ४ मोटार सायकली व एका घरफोडीच्या गुन्ह्यातील सोन्याचे पदक असा एकूण १,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिपरी चिंचवड परिसरातील मोटार सायकल/वाहन चोरी गुन्हयांना आळा घालण्यासाठी व दाखल गुन्ह्याची जलद गतीने उकल करण्यासाठी  सूचना दिल्या होत्या. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ च्या पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर यांनी महाळुंगे औद्योगिक परिसरातील मोटार सायकल चोरीच्या ठिकाणांचे क्राईम मॅपिंग करणे, अचानक नाकाबंदी करुन कागदपत्र तपासणे, सतर्क पेट्रोलिंग करणे, वाहन चोरीच्या घटना घडलेल्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हयाची उकल करणे याबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार, पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली. 

दक्षिण महाळुंगे एम. आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी आरोपी प्रकाश तेज विश्वकर्मा (वय २० वर्षे, सध्या राहणार - भोसरी) याला येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले आहे. तो मूळचा नेपाळचा आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता व सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्याने महाळुंगे एमआयडीसी व आसपासच्या परिसरातून एकूण ४ मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले.  सदर आरोपीने एक घरफोडी केल्याचेही उघड झाले आहे. या आरोपीकडून चोरीच्या ४ मोटारासायकल व घरफोडीमधील सोन्याचे दिड ग्रॅम सोन्याच्या पदकासह एकूण १ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या एकूण ४ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलिस आयुक्त सारंग अव्हाड, अप्पर पोलिस आयुक्त बसवराज तेली, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ४  श्वेता खेडकर, सहाय्यक पोलिस आयुक्त, महाळुंगे विभाग सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलिस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस अंमलदार देवराम पारधी, विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, युवराज बिराजदार, चेतन सावंत, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हणमंते, प्रशांत कसबे, शिवाजी मरकड, आकाश घाडगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories