एम एन जी एल बिलाचा व्यवहार असल्याचे भासवत केला फोन हॅक, बँक खात्यातून 1 लाख 58 हजार रुपये लंपास
May 13 2026
40
एम एन जी एल बिलाचा व्यवहार असल्याचे भासवत केला फोन हॅक, बँक खात्यातून 1 लाख 58 हजार रुपयांचा अपहार
पिंपरी, ता. १३ - एम एन जी एल चे बिल थकले आहे असा मेसेज आल्यानंतर एका इसमाने विश्वास ठेवून समोरुन आलेली फाईल ओपन करून क्रेडिट कार्डची माहिती भरली आणि त्या इसमाच्या बँक खात्यातून तब्बल 1लाख 58 हजार 800 रुपये काढून घेतले. ऑनलाइन फसवणूकीची ही घटना 6 व 7 मे रोजी घडली आहे.
या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फसवणूकीला बळी पडलेल्या इसमाने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी हे नेवाळे वस्ती, चिखली येथील रहिवासी आहेत. सहा व सात मे या दिवशी आरोपी ने फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि थकित बिल न भरल्यास गॅस कनेक्शन कट होईल अशी भीती घातली.
त्यामुळे त्या इसमाने समोरच्या व्यक्तीवर विश्वास सदर अज्ञात इसमाने म्हणजे आरोपीने पाठविलेली फाईल ओपन केली आणि थकीत बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्ड ची माहिती भरली. तेव्हा आरोपीने फिर्यादीचा फोन हॅक केला आणि फिर्यादीच्या बँक खात्यातून तब्बल एक लाख 58 हजार 800 रुपये टप्प्याटप्प्याने काढून घेतले.
आरोपीवर मंगळवारी ( ता. 12) चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३१६ (२), ३१८ (४), सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.