news
clock
वडीलांकडून मुलाच्या साथीने मुलगी व जावयाची २५ लाखांची फसवणूक

वडीलांकडून मुलाच्या साथीने मुलगी व जावयाची २५ लाखांची फसवणूक

वडीलांकडून मुलाच्या साथीने मुलगी व जावयाची २५ लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. २५ - मुलगी व जावयाला नवीन व्यवसाय सुरु करुन देण्याचे तसेच २५ लाख रुपये गुंतवल्यास एक गुंठा प्लॉट देण्याचे आमिष दाखवून वडीलांनीच मुलाच्या साथीने मुलगी व जावयाची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना ऑक्टोबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये महात्मा फुलेनगर-चिंचवड येथे घडली आहे. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फसवणूकीबाबत प्रियांका स्वप्निल पोटे (वय ३४, रा. महात्मा फुलेनगर, सेक्टर क्र. १८, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.

 ऑक्टोबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये फिर्यादी पोटे यांचे वडिल दिलीप राधा किसन औताडे यांनी त्यांची कन्या फिर्यादी प्रियांका स्वप्निल पोटे व त्यांचे पती स्वप्निल श्रीधर पोटे यांचा विश्वास संपादन केला. त्यांना नवीन व्यवसाय टाकून देतो, नवीन पतसंस्था टाकणार आहे त्यामध्ये सभासद करुन घेतो, त्याचबरोबर २५ लाख रुपये भरल्यानंतर एक गुंठ्याचा प्लॉट घेऊन देतो असे अमिष दाखवले आणि मुलगी व जावयाकडून वेळोवळी एकुण २३ लाख रुपये ऑनलाईन घेतले. फिर्यादी प्रियांका यांचा भाऊ शुभम औताडे यानेही बहिणीकडून २ लाख रुपये ऑनलाईन घेतले.  मात्र, या वडील आणि मुलाने प्रियांका व स्वप्नील यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही व घेतलेली रक्कम त्यांना परतही दिली नाही. या प्रकारात प्रियांका व स्वप्नील या दांपत्याची एकूण २५ लाखांची फसवणूक झाली आहे. 

आता आरोपी दिलीप राधा किसन औताडे व शुभम दिलीप औताडे (दोघे रा. निर्मलनगर, न्यू आर्ट्स कॉलेजजवळ, शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांच्याविरोधात चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३१८ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories