news
clock
ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने १५ लाख ३५ हजार ११७ रुपयांची  फसवणूक

ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने १५ लाख ३५ हजार ११७ रुपयांची फसवणूक

 ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने १५ लाख ३५ हजार ११७ रुपयांची  फसवणूक

पिंपरी, ता. ३  - ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने १५ लाख ३५ हजार ११७ रुपयांची  फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. २४ डिसेंबर २०२५ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान ही फसवणूक झाली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत फसवणूक झालेल्या इसमाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकाश वर्मा (वय ५० वर्षे), तानिया शेख (वय ३५ वर्षे) व अनली (वय ३० वर्षे) हे आरोपी आहेत. फिर्यादीचा मोबाईल क्रमांक एका या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी प्रेम प्रकाश वर्मा यांनी फिर्यादीस दुसऱ्या ग्रुपमध्ये सहभागी करुन शेअर मार्केट व आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. फिर्यादीस ऑनलाईन अकाउंटवर ५५ लाख रुपयांचा बॅलन्स दिसत असल्याचे दाखवण्यात आले.

 २१ जानेवारी रोजी पैसे काढताना आरोपींनी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सच्या नावाखाली ६ लाख ६२ हजार ११७ रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादीने दिलेल्या खात्यांवर रक्कम जमा केली. त्यानंतर आरोपींनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडून संपर्क तोडला आणि त्यावेळी फिर्यादीला एकूण १५ लाख ३५ हजार ११७ रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आहे.

या प्रकरणी आरोपींविरोधात पिंपरी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories