news
clock
सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याबद्दल महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याबद्दल महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याबद्दल महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी, ता. १९ - बेंगळुरू-मुंबई हायवेवर बावधन परिसरात वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने  सार्वजनिक शिष्टाचार भंग केल्याबद्दल एका महिलेविरोधात बुधवारी (ता. १८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी (ता. १८) सायंकाळी सुमारे साडेसातच्या सुमारास बावधन परिसरात एक महिला वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारुन, डोळ्यांनी खुणावत होती आणि हाताने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करत होती. सार्वजनिक शिष्टाचार भंग झाला.

आरोपी महिलेविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories