किररोळ कारणावरुन ग्राहकाची हॉटेल मॅनेजरला मारहाण
पिंपरी, ता. ८ - खराळवाडी-पिंपरी येथे उडपी लंच होम हॉटेलमध्ये ग्राहकाने वेटरला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. ६) घडली. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत, राघवेंद्र सिताराम शेटटी (वय ४५ वर्षे, धंदा नोकरी (मॅनेजर) रा. उडपी लंच होम, खराळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी संकेत सकपाळ (वय २७ वर्षे, रा. खराळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संकेत याने फिर्यादी शेट्टी यांचा वेटर रिती यादव याला शिविगाळ केली. जेवणाचे बिल मागितले असता त्याचा मनात राग धरुन त्याने त्याच्या जवळ असलेली दुचाकीची चावी फिर्यादी शेट्टी यांच्या डोक्यावर व पाठीवर मारुन त्यांना जखमी केले आहे.
आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१),३५१ (२), (३),३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.