news
clock
पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी होतोय लाखो रुपयांचा खर्च

पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी होतोय लाखो रुपयांचा खर्च

पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी होतोय लाखो रुपयांचा खर्च 

पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार कामे केली जात असल्याचा अधिकाऱ्यांचा खुलासा

पुणे, ता. १४ - निवडणुकीनंतर पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या विविध दालनांच्या सुशोभिकरणासाठी प्रशासन लाखो रुपये खर्च करत आहे. यावर, पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून ही कामे केली जात आहेत, असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले आहे. 

महापालिकेतील सभागृह नेता, स्थायी समिती, उपमहापौर, सभागृह या किरकोळ काम करण्यात आले आहे. विविध विषय समित्यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे. नवीन फर्निचर, रंगकाम, अंतर्गत दुरुस्ती अशी सुशोभिकरणाची कामे केली जात आहेत. चार वर्ष ही कार्यालये बंद असल्याने आता पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार नवीन कामे करण्यात येत आहेत, असे प्रशासनाने सांगितले.

महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीमधील मुख्य सभागृहातील डिजिटल ऑडिओ कॉन्फरन्स सिस्टीमच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सुमारे ६२ लाख ८५ हजार ७०१ रुपये खर्च करण्यात आले आहेत. या कामामध्ये मायक्रोफोन, वायरलेस मायक्रोफोन, अम्प्लिफायर, डिस्ट्रिब्युशन यंत्रणा, स्पीकर्स तसेच ऑडिटोरियममधील ऑडिओ सिस्टीमचे सर्व्हिसिंग यांचा समावेश आहे. वायरिंगचे कामही सुरु आहे. या कामासाठी विद्युत विभागाने सुमारे ६३ लाख ८४ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र सभागृहातील ही यंत्रणा काही वर्षांपूर्वीच बसविण्यात आली होती. तरीही एवढा मोठा खर्च केला जात आहे.


 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories