news
clock
५,५०० झाडांची लागवड करुन 'पीएमआरडीए'चे पर्यावरण संवर्धनासाठी स्तुत्य पाऊल

५,५०० झाडांची लागवड करुन 'पीएमआरडीए'चे पर्यावरण संवर्धनासाठी स्तुत्य पाऊल

५,५०० झाडांची लागवड करुन 'पीएमआरडीए'चे पर्यावरण संवर्धनासाठी स्तुत्य पाऊल 

पिंपरी, ता. ५ - हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामामध्ये अनेक झाडे काढावी लागली होती. ही हानी भरुन काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) ५ हजार ५०० नवीन झाडांची लागवड करण्यात आली आहे आणि अनेक झाडांचे पुनर्रोपण केले असून ते यशस्वी झाले आहे.

पीएमआरडीए प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामात मेट्रो मार्गावरील खांब, स्थानके आणि जिन्यांच्या उभारणीमध्ये एकूण १ हजार ३०५ झाडे बाधित झाली होती. पीएमआरडीएने यापैकी ५५७ झाडे तोडली आणि उर्वरित ७४८ झाडांचे सुरक्षितरीत्या पुनर्रोपण केले. या पुनर्रोपण केलेल्या ८० टक्के झाडांनी मूळ धरले असून या झाडांना आता फुले-फळे येण्यास सुरुवात झाली आहे. 

झाडे तोडल्यामुळे झालेले निसर्गाचे नुकसान भरुन काढण्यासाठी तब्बल ५ हजार ५०० नवीन झाडे लावण्याचा आली. ही नवीन झाडे पशुसंवर्धन विभाग, ताथवडे येथील कास्टिंग यार्ड, बावधनचे एनडीए वनक्षेत्र, एनसीएल, पंचवटी, हिंजवडी फेज-३ मधील एमआयडीसी प्लॉट, राजभवन आणि कृषी महाविद्यालय याठिकाणी लावली आहेत. लावलेल्या प्रत्येक झाडावर एक 'क्यूआर कोड' लावण्यात आला आहे. नागरिकांनी मोबाईलवरुन हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास, त्यांना संबंधित वृक्षाचे नाव, त्याची प्रजाती आणि त्या झाडाचे महत्त्व ही माहिती पाहायला मिळते. 

''मेट्रो मार्ग-३ च्या कामात केवळ पायाभूत विकासाबरोबरच, पर्यावरण संवर्धनालाही 'पीएमआरडीए'ने  प्राधान्य दिले आहे. पुनर्रोपित झाडांना आलेली फळे-फुले हे यश आहे. नवीन झाडे लावल्यानंतर त्यांचे जिओटॅगिंग करण्यात आले आहे.'' असे 'पीएमआरडीए'चे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories