श्री रामनवमीनिमित्त गुरुवारी शहरात विविध ठिकाणी वाहतूकीत बदल, पर्यायी मार्गांचे नियोजन
श्री रामनवमीनिमित्त गुरुवारी शहरात विविध ठिकाणी वाहतूकीत बदल, पर्यायी मार्गांचे नियोजन
पिंपरी, ता. २५ - श्री रामनवमी गुरुवारी (ता. २६) साजरी होत आहे. शहरातील उपनगरांमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे तसेच अनेक ठिकाणी मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विविध ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. उत्सवा दरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी उद्या विविध मार्गांवरील वाहतूकीत बदल करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश पिपंरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केले आहेत.
वाहतूकीतील बदल गुरुवारी (ता. २६) सकाळी १० ते रात्री २२ या वेळेत लागू असणार आहेत. नागरीकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
वाहतूकीतील बदल पुढीलप्रमाणे आहेत -
- भोसरी वाहतुक विभाग -
- १. हरिओम स्वीट चौकातून दिघी रोडने भोसरी ओव्हर ब्रिज खाली येण्या जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग:- सदरची वाहने हरिओम स्वीट चौकातून उजवीकडे वळुन, विदर्भ मित्र मंडळापासून डावीकडे वळुन आळंदी रोडने इच्छितस्थळी जातील.
२. दिघी चौकातून दिघी रोडला जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्गः- सदरची वाहने पीएमटी चौकातून आळंदी रोडने इच्छितस्थळी जातील.
- चिखली वाहतुक विभाग -
- १. पुणे नाशिक महामार्गावरुन छत्रपती शिवाजी महाराज चौक मोशी येथे येण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग :- भारतमाता चौक येथून इच्छित स्थळी जातील.
- २. वाय पॉईंट कुदळवस्ती येथुन अनुष्का सोसायटी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मोशी येथे येण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- भारतमाता चौक येथून इच्छितस्थळी जातील.
चाकण वाहतुक विभाग -
- १. चाकण चौकाकडून महात्मा फुले चौक व नेहरु चौकाकडे येण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग १. माणिक चौक, मेदनकरवाडी मार्गे इच्छितस्थळी जातील.
२. तळेगाव चौक आंबेठाण चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
- २. आंबेठाण चौक बाजूकडून महात्मा फुले चौकाकडे येण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- चाकण तळेगाव चौकातुन मेदनकरवाडी चौक मार्गे शिक्रापुर रोडने इच्छितस्थळी जातील.
- ३. मार्केट यार्ड चाकण बाजूकडून नेहरु चौक बाजुकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- आंबेठाण चौक मार्गे चाकण चौकातुन इच्छितस्थळी जातील.
-४. नेहरु चौकाकडून शनि मंदिर रोडकडे येण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.,
पर्यायी मार्ग १. आंबेठाण चौक मार्गे चाकण चौकातुन इच्छितस्थळी जातील.
२. बीड वस्तीमधुन खंडोबा माळ चौकातुन मेदनकरवाडी रोडने इच्छितस्थळी जातील.