'आयआयईबीएम' संस्थेतर्फे ‘रणभूमी - २०२६’ इंटर-कॉलेज स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचे आयोजन

'आयआयईबीएम' संस्थेतर्फे ‘रणभूमी - २०२६’ इंटर-कॉलेज स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचे आयोजन

'आयआयईबीएम' संस्थेतर्फे ‘रणभूमी - २०२६’ इंटर-कॉलेज स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचे आयोजन

पिंपरी, ता. २७ - 'आयआयईबीएम - इंडस बिझनेस स्कूल'च्या वतीने ‘रणभूमी - २०२६’ या मेगा इंटर-कॉलेज स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचे आयोजन केले आहे. ही तीन दिवसीय स्पर्धा येत्या १२ ते १४ मार्च  दरम्यान पुण्यातील वाकड व चांदखेड येथे पार पडणार आहे. यामध्ये, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ आणि ४×१०० मीटर रिले रेस असे चार क्रीडा प्रकारांच ही स्पर्धा रंगणार आहे.  

रणभूमी चॅम्पियनशीपमध्ये ३५ पेक्षा जास्त महाविद्यालयांचे सहभागी होणार आहेत. १७ हून अधिक प्रायोजक लाभले आहेत. विजेत्ययांसाठी १ लाख ५० हजारांपेक्षा अधिक बक्षीसे असणार आहेत. दिनांक १२ आणि १३ मार्च रोजी सामने चांदखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब येथे होणार असून, १४ मार्च रोजी वाकड येथील IIEBM कॅम्पसवर पुरस्कार वितरण समारंभ होईल. यावेळी हाय-ऑक्टेन डीजे शो आयोजित करण्यात आला आहे. विशेष वस्तूंची विक्री आणि मनोरंजन कार्यक्रमांमुळे हा क्रिडासोहळा रंगतदार होणार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories