news
clock
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील २५ हजार विद्यार्थ्यांना जेवणासाठी प्लेट वाटप....................आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराचा उपक्रम

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील २५ हजार विद्यार्थ्यांना जेवणासाठी प्लेट वाटप....................आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराचा उपक्रम

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील २५ हजार विद्यार्थ्यांना जेवणासाठी प्लेट वाटप

आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराचा उपक्रम 

​पिंपरी, ता. ७ - चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त 'आमदार शंकरभाऊ जगताप मित्र परिवारा'च्या वतीने शहरात स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तब्बल २५ हजार विद्यार्थ्यांना जेवणासाठी प्लेट वाटप करण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

​वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक होर्डिंगवर होणारा खर्च टाळून थेट विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपयोगी पडणारी वस्तू भेट देण्याचा निर्णय आमदार शंकरभाऊ जगताप मित्र परिवाराने घेतला आहे. महापालिकेच्या विविध प्राथमिक शाळांमध्ये या वाटप प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने शहरातील २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचवली जात आहे. या उपक्रमात महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह सर्व प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका तसेच आजी-माजी पदाधिकारी यांनी सहभाग घेतला असून, त्यांच्या हस्ते प्लेट्स वाटप करण्यात येत आहे. 


या उपक्रमामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे, अशी माहिती महापालिका शिक्षण मंडळ सभापती रविना आंगोळकर यांनी दिली आहे. 


विद्यार्थ्यांचे समाधान हीच भेट...

​"आमदार शंकरभाऊ जगताप यांनी नेहमीच शालेय विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. महापालिका शाळांमधील मुलांची गरज ओळखून त्यांना २५ हजार जेवणाचे प्लेट वाटप करणे, ही त्यांची संवेदनशीलता दर्शवते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाची खरी भेट आहे."

- रविना आंगोळकर, सभापती, शिक्षण मंडळ, पिंपरी-चिंचवड महापालिका

सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श...

​"वाढदिवसानिमित्त केवळ उत्सव साजरा न करता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत उपयुक्त मदत पोहोचवणे ही जगताप परिवाराची परंपरा आहे. २५ हजार विद्यार्थ्यांना जेवणासाठी दर्जेदार प्लेट देऊन आमदार शंकरभाऊ जगताप मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श शहरासमोर ठेवला आहे. हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध आणि कौतुकास्पद आहे."

- अभिषेक बारणे, अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका

राजकारणापलीकडची समाजसेवा....

"आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या गरजेचा विचार होणे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. महापालिका शाळांमधील मुलांच्या हाती अभ्यासाच्या साहित्यासोबतच आता जेवणासाठी दर्जेदार ताटही मिळाले आहे. राजकारणापलीकडे जाऊन समाजसेवा कशी करावी, याचे उत्तम उदाहरण आहे."

- महापौर रवी लांडगे



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories