news
clock
संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त किवळे-विकासनगरमध्ये स्वच्छता अभियान

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त किवळे-विकासनगरमध्ये स्वच्छता अभियान

 संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त किवळे-विकासनगरमध्ये स्वच्छता अभियान

पिंपरी, ता. २४ - किवळे-विकासनगर येथे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवछत्रपती चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

यावेळी सफाई कामगारांसोबत अधिकारी, नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. दरम्यान, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, नानासाहेब डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

त्यांनंतर सर्व उपस्थित सफाई कर्मचारी व अधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश लुनावत, बापूसाहेब गायकवाड, रामहरी वाघ, राजेंद्र महाले, राजेंद्र तरस, दिलीप रोकडे, दिलीप कडलग उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories