news
clock
महापालिकेच्या विशेष सभेत शनिवारी होणार स्थायी समितीच्या सभापतींची निवड

महापालिकेच्या विशेष सभेत शनिवारी होणार स्थायी समितीच्या सभापतींची निवड

महापालिकेच्या विशेष सभेत शनिवारी होणार स्थायी समितीच्या सभापतींची निवड

पिंपरी, ता. २४ -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची विशेष सभा येत्या शनिवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित केली आहे. या सभेत स्थायी समितीचे सभापती निवडले जाणार आहेत. 

शुक्रवारी (ता. २०) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भाजच्या अभिषेक बारणे, शालिनीताई गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्णेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे या ११ नगरसेवकांचा समावेश आहे. यापैकी बाबासाहेब त्रिभुवन व योगिता नागरगोजे यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर असणार आहेत. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories