news
clock
तळेगाव दाभाडेमध्ये ७ लाखांचे मॅफेड्रोन जप्त, दोघांना अटक

तळेगाव दाभाडेमध्ये ७ लाखांचे मॅफेड्रोन जप्त, दोघांना अटक

तळेगाव दाभाडेमध्ये ७ लाखांचे मॅफेड्रोन जप्त, दोघांना अटक 

पिंपरी, ता. ३ - एकूण ७ लाख १२ हजार रुपये किंमतीचे ११ ग्रॅम २१ मीलीग्रॅम मॅफेड्रॉन तळेगाव पोलिसांनी रविवारी (ता. १) तळेगाव दाभाडे परिसरात जप्त केले आहे. हे मॅफेड्रॉन बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीं विरोधात एन. डी. पी. एस अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  इलाही अकबर शेख (वय ३७ वर्षे, रा. पवारनगर, थेरगाव) व रफिक करीम मुजावर (वय ४३ वर्षे, रा. वाल्हेकर वाडी, श्रीपती कॉलनी, चिंचवड) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

आरोपींच्या ताब्यात एकूण ७, १२,०००/- रुपये किंमतीचा ११ ग्रॅम २१ मीलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ सापडला. हा पदार्थ आरोपींनी  बेकायदेशिररित्या विक्रीसाठी जवळ बाळगला होता. आरोपींविरोधात एन. डी. पी. एस अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories