news
clock
वारकरी महामंडळाच्या वतीने महापौर रवी लांडगे यांचा सन्मान

वारकरी महामंडळाच्या वतीने महापौर रवी लांडगे यांचा सन्मान

वारकरी महामंडळाच्या वतीने महापौर रवी लांडगे यांचा सन्मान

पिंपरी, ता. २४ - ''पिंपरी-चिंचवड शहराची जागतिक स्तरावर ओळख 'औद्योगिक नगरी' म्हणून असली, तरी या शहराला भक्तीचा आणि वारकरी संप्रदायाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ही परंपरा नव्या पिढीकडे अधिक सक्षमपणे रुजवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.'', असा विश्वास महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केला.

वारकरी महामंडळाच्या वतीने पिंपरी महापालिकेत महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी त्यांना विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा संस्थेतर्फे भेट देण्यात आली.

महापौर लांडगे म्हणाले, ''वारकरी संप्रदायाने दिलेली शिकवण ही समाजाला जोडणारी आहे. पिंपरी चिंचवड शहरात आगामी काळात वारकरी बांधवांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाईल. विशेषतः बाल वारकऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यात संस्कार रुजवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील.''

यावेळी वारकरी महामंडळ पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष विजय जगताप, कार्याध्यक्ष सुनील भोईर, नगरसेविका कुंदाताई भिसे, उपाध्यक्ष विजयराज गायकवाड, किशोर पाटील, कैलास कातळे, ज्ञानेश्वर भाडळे, तानाजी काळभोर, संजय भिसे, सतपाल ढोरे, दिनेश मोरे उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories