डॉ. विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती
Mar 12 2026
53
डॉ. विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती
पिंपरी, ता. १२ - कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश शासनाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी बुधवारी (ता. १२) जारी केला आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची ७ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली झाली होती. त्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मागील पाच महिन्यांपासून हर्डीकर यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार होता. आता त्यांच्याकडील आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार काढला आहे.
महापालिकेचे कामकाज वेगाने व सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी प्रशासनाकडून पूर्णवेळ आयुक्तांची मागणी होत होती. महापौर रवी लांडगे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत मागणी केली होती.
डॉ. सूर्यवंशी हे सन २००६ बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) अतिरिक्त महानगर आयुक्त आणि रायगड व गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे