news
clock
हिंजवडीत प्रतिबंधित गुटखा विक्रीप्रकरणी दुकानदार अटकेत

हिंजवडीत प्रतिबंधित गुटखा विक्रीप्रकरणी दुकानदार अटकेत

हिंजवडीत प्रतिबंधित गुटखा विक्रीप्रकरणी दुकानदार अटकेत

पिंपरी, ता. ५ - हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी एका दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे १४ हजार ८४२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई बुधवारी (ता. ४) दुपारी सुमारे १.१० वाजता भुजबळवस्ती रोड, वाकड येथील श्री धनलक्ष्मी ट्रेडर्स या दुकानात करण्यात आली. या प्रकरणी पोलिस शिपाई मितेश मोहन यादव (वय ३४) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रताप गेपरराम देवासी (वय ३१, रा. भुजबळवस्ती, हिंजवडी) याने शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू व पानमसाला यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या खरेदी करून विक्री केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकून विविध कंपन्यांचा एकूण १४,८४२ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७१, २७२, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ३० (२)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रताप देवासी याला अटक करण्यात आली असून शेसाराम परमार (रा. मारुंजी, हिंजवडी) हा दुसरा आरोपी फरार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories