news
clock
कचरा टाकण्याच्या कारणावरुन भोसरीमध्ये तिघींना मारहाण

कचरा टाकण्याच्या कारणावरुन भोसरीमध्ये तिघींना मारहाण

कचरा टाकण्याच्या कारणावरुन भोसरीमध्ये तिघींना मारहाण 

पिंपरी, ता. २७ - कचरा टाकण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून महिलेवर व तिच्या दोन बहिणींना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना मोशीमध्ये गुरुवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी आरोपींवर भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी जयश्री भगवान मिसाळ (वय ५५, रा. नागेश्वर कॉलनी नं. १, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मारहाणीच्या घटनेत गुरुनाथ जाधव (वय-५० वर्ष), श्रीदेवी गुरुनाथ जाधव (वय ३८ वर्ष) व एक अल्पवयीन गुन्हेगार आरोपी आहेत. फिर्यादी जयश्री या घरी असताना शेजारी राहणाऱ्या आरोपी श्रीदेवी व तिचा मुलगा समर्थ यांनी त्यांना कचरा टाकण्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादी जयश्री यांच्या बहिणी विजया व प्रमीला यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपी गुरुनाथ यानेही क्रमांक १ यानेही प्रमीला यांना मारले. 

या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३२४ (४), ३५२, ३ (५) तसेच भादंवि कलम ३२३, ३२४, ४२७, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories