सोने वितळवताना कामगारानेच केला २२ लाखांच्या सोन्याचा अपहार
Feb 16 2026
81
सोने वितळवताना कामगारानेच केला २२ लाखांच्या सोन्याचा अपहार
पिंपरी, ता. १६ - सराफी दुकानातील कामगारानेच सोने वितळवताना २२ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याचा अपहार केला आहे. ही घटना गांधी पेठ-चिंचवडगाव येथील प्रियांका ज्वेलर्समध्ये २ एप्रिल २०२५ ते १२ फेब्रुवारी २०२६ यया कालावधीत घडली आहे. पोलिसांनी आरोपी कामगाराला अटक केली आहे, त्याच्याविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात रविवारी (ता. १५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, ज्वेलर्सचे मालक देवेश कैलाश वर्मा (वय २७ वर्षे, रा. भूमकर चौक, वाकड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुकानात काम करणारा कामगार आरोपी श्रीमंता संतोष समांता (वय ४३ वर्षे, रा. चिंचवडगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (४), ३१८(४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी दुकानाचे मालक देवेश वर्मा हे आरोपी कामगाराकडे विश्वासाने सोने वितळवण्यासाठी देत होते. त्या सोन्यातून २२ लाख ५ हजार रुपये किंमतीचे २४५ ग्रॅम सोने आरोपीने स्वतःच्या फायदाकरीता काढून घेवून फिर्यादीची फसवणूक केली आहे.
--------------------------------------------------------------------------------------------