news
clock
१८ लाख ९१ हजारांचे मॅफेड्रॉन चिखलीतून जप्त, युवकाला अटक

१८ लाख ९१ हजारांचे मॅफेड्रॉन चिखलीतून जप्त, युवकाला अटक

१८ लाख ९१ हजारांचे मॅफेड्रॉन चिखलीतून जप्त, युवकाला अटक

पिंपरी, ता. १९ - साडेसतरा लाखांहून अधिक रुपयांचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या २५ वर्षीय युवकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (ता.१७) जाधववाडी-चिखली येथून अटक केली आहे. त्याच्याकडून ६३ ग्रॅम ०६ मिली ग्रॅम मॅफेड्रॉन, १ मोटारसायकल, २ मोबाईल, रोख रक्कम व इतर मुददेमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

फैजान झहीर अहमद शेख वय २५ वर्षे (रा. चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने  एकूण १७ लाख ९१ हजार रुपये किंमतीचा १६३ ग्रॅम ०६ मिली ग्रॅम वजनाचा एम. डी (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगला होता. हा अंमली पदार्थ त्याने कोणाकडून आणला याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर एम. डी (मॅफेड्रॉन) हा इतर दोन साथीदारांकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. 

आरोपी शेख कडून १ मोटारसायकल, २ मोबाईल, रोख रक्कम व इतर मुददेमालही जप्त केला आहे. 

आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories