अजितदादांच्या अस्थिकलशाचे शहरवासियांनी घेतले दर्शन

पिंपरी, ता. ३ - राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन असंख्य शहरवासियांनी मंगळवारी (ता. ३) घेतले आणि अजितदादांना वंदन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने  पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील प्रांगणात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी ठेवला होता.

पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल व नगरसेवकांनी अस्थिकलश स्मारकाच्या प्रांगणात आणला. त्यानंतर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यावेळी व्यक्त झालेल्या मनोगतांमध्ये अनेक अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. पिंपरी-चिंचवड शहराशी अजितदादांचे घट्ट नाते असल्याने शहरवासियांनीही दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.  




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance